सावंतवाडी,दि.१५ : सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार संघाची बैठक मंगळवार दि.१७ ऑक्टोबर रोजी सकाळी,१०.३० वाजता सावंतवाडी श्रीधर अपार्टमेंट सावंतवाडी एसटी बस स्टॅण्ड समोरील मंत्री दिपक केसरकर यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
गिरणी कामगार व वारसदार शामराव कुंभार, लाॅरेन्स डिसोजा, रामचंद्र कोठावळे, विलास शेट्ये,राजन शेट्ये मोरजकर, निलेश देसाई,राजन पडते आदींनी सावंतवाडी मध्ये मॅगो हाॅटेल मध्ये बैठक घेऊन दिनकर मसगे यांचे नुकतेच निधन झाले आहे त्यामुळे त्यांच्यानंतर सिंधुदुर्ग गिरणी कामगार संघाचे कामकाज पुढे चालू ठेवले पाहिजे. गिरणी कामगार व वारसदार यांच्या प्रश्नांची उकल करत येत्या दि.१२ नोव्हेंबर पुर्वी गिरणी कामगार व वारसदार यांच्या रुम बाबतीत म्हाडा च्या निर्देशानुसार पुर्तता करण्यासाठी मंगळवार दि.१७ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता श्रीधर अपार्टमेंट ( शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांच्या) कार्यालयात पुर्वी प्रमाणे जमून चर्चा करून निर्णय घेतला पाहिजे असे ठरवले आहे. प्रत्येकाने एकमेकांना कळवून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शाम कुंभार यांनी केले आहे.