पिकपाहणी नोंद होणेसाठी योग्य ती उपाययोजना करावी.. ग्रामस्थांची मागणी
सावंतवाडी,दि.११: तालुक्यातील शिरशिंगे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जमिनी सामाईक असल्याने पीक पाहणी नोंद करताना समस्या येत आहेत. सामाईक क्षेत्र असल्याने सामाईक क्षेत्रात पीक पाहणी नोंदणी करता येत नाही. शिरशिंगे गावातील जमिनी सामाईक असल्याने प्रत्येक खातेदाराला पीक पाहणी नोंदणी करता येत नाही. पीक पाहणी नोंदणी झाली नाही तर शेतक-याला विविध विभागाअंतर्गत मिळणारे लाभ पिक विमा लाभ, अतिवृष्टी नुकसान भरपाई यांसारखे लाभ मिळत नाही, या संदर्भात संदर्भात काल मंगळवारी मंगळवारी शिरशिंगे ग्रामस्थांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांची भेट घेऊन त्यांना आपल्या स्तरावर पिकपाहणी नोंद होणेसाठी योग्य ती उपाययोजना करावी अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले.
यावेळी शिरशिंगे सरपंच दीपक राऊळ, पंचायत समिती माजी सभापती रवींद्र मडगावकर, माजी सरपंच नारायण राऊळ,माजी सरपंच सुरेश शिर्के, उपसरपंच सचिन धोंड,माजी उपसरपंच पांडुरंग राऊळ, पोलीस पाटील गणू राऊळ, ग्रामपंचायत सदस्य बाळा पेडणेकर, श्री शिर्के आदी उपस्थित होते.