Site icon Kokandarshan

मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत सावंतवाडी तालुक्यातील युवकांचा मनसेत प्रवेश..

सावंतवाडी,दि.१०: तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी सुरू केली असून आज तालुक्यातील युवकांनी मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.

यावेळी स्वप्नील जाधव, विजय जांभळे, सुनील नाईक, संदेश सावंत, रमेश शेळके, अभिषेक पेडणेकर, प्रणित टाळकर, विशाल गांवकर नितीन गावकर, ओंकार गांवकर अतुल गांवकर ज्ञानेश्वर नाईक विशाल बर्डे आदींनी पक्षात प्रवेश केला.

आशिष सुभेदार यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष पद आल्यापासून पक्षात युवकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
दरम्यान बोलताना मनसे नेते परशुराम उपरकर आणि सुभेदार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण पक्षात प्रवेश केला असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

यावेळी माजी शहराध्यक्ष तथा मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, मनसे रस्ते साधन सुविधा व आस्थापना उपजिल्हा संघटक अभय देसाई, मनविसे जिल्हा सचिव निलेश देसाई, स्वप्नील जाधव, विजय जांभळे, सुनील नाईक, संदेश सावंत, रमेश शेळके, अभिषेक पेडणेकर, प्रणित टाळकर, विशाल गांवकर नितीन गावकर, ओंकार गांवकर अतुल गांवकर ज्ञानेश्वर नाईक आदी उपस्थित होते.

Exit mobile version