Site icon Kokandarshan

दिवाळीनंतर या स्मार्टफोनमध्ये नाही चालणार WhatsApp, तुमच्याकडे तर नाही ना हा हँडसेट?

मुंबई,  संभाषणाचे दुसरे नाव व्हॉट्सॲप (WhatsApp) आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कौटुंबिक चर्चेपासून ते ऑफिसच्या कामांपर्यंत प्रत्येक संभाषणाची देवाणघेवाण ही व्हॉट्सॲपवरच होते. व्हॉट्सॲपचे जगभरात 2 अब्ज सक्रिय युजर्स आहेत. एकट्या भारतात त्याचा आकडा  500 दशलक्षाहून अधिक आहे. आता दिवाळी जवळ आली आहे. या निमित्त अनेकजण व्हॉट्सॲपवरून शुभेच्छा पाठवतील, व्हिडीओ कॉलकरून आपल्या प्रियजनांशी गप्पा मारतील, फोटो आणि व्हिडिओ शेअर करतील. मात्र दिवाळीपासून सर्वांनाच ही सुविधा मिळणार नाही. iPhone आणि Android च्या काही जुन्या व्हर्जनवर  WhatsApp काम करणार नाही. दिवाळीच्या दिवशी म्हणजे 24 ऑक्टोबरला व्हॉट्सव्हॉट्स जुन्या iOS आणि Android ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करणार नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे असे फोन आहेत त्यांना व्हॉट्सॲपची सेवा मिळणार नाही.

या फोनवर वापरता येणार नाही WhatsApp

iOS 10 आणि iOS 11 वर चालणाऱ्या iPhones साठी WhatsApp आपला सपोर्ट काढून घेत आहे. म्हणजेच व्हॉट्सॲप या प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टीमसह आयफोनवर काम करणार नाही. यासोबतच iPhone 5 आणि iPhone 5C चे वापरकर्ते व्हॉट्सॲपची सेवा घेऊ शकणार नाहीत. याबाबत व्हॉट्सॲपने म्हटले आहे की, अशा फोनवर आपली सेवा बंद केली जात आहे कारण भविष्यात काही अपडेट्स येणार आहेत जे अशा फोनवर काम करणार नाहीत.

iOS 12 आणि त्याच्या वरच्या ऑपरेटिंग सिस्टमवर सुरळीत चालेल. WhatsApp नेहमी आपल्या वापरकर्त्यांना नवीन व्हर्जन अपग्रेड करण्याचा सल्ला देते जेणेकरुन नवीन वैशिष्ट्ये उपलब्ध होऊ शकतील आणि हे ॲप स्मार्टफोनवर सुरळीतपणे चालू शकेल.

या अँड्रॉइड फोनवरून काढून टाकले जाईल व्हॉट्सॲप

आयफोनप्रमाणेच काही अँड्रॉईड फोनवर व्हॉट्सॲप काम करणार नाही. कंपनीने म्हटले आहे की, 4.1 किंवा त्यापेक्षा जुन्या आवृत्तीवर चालणाऱ्या अँड्रॉईड फोनला व्हॉट्सॲप सेवेचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच अशा फोनवरून मेसेज पाठवता येणार नाही  कॉल किंवा व्हिडिओ कॉलही करता येणार नाही. यासाठी यूजरला त्याच्या फोनची ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करावी

Exit mobile version