Site icon Kokandarshan

बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्या अध्यक्षपदी अर्चित पोकळे

सावंतवाडी,दि .१०: शहरातील बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्या अध्यक्षपदी अर्चित पोकळे यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी दिलीप राऊळ, खजिनदार शैलेश मेस्त्री, उप खजिनदार बिट्टू सुकी, सेक्रेटरीपदी तेजस टोपले यांची निवड करण्यात आली आहे. रविवार १५ ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या नवरात्र उत्सवात दरवर्षीप्रमाणे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भरगच्च आयोजनही करण्यात आले आहे. भजन, फुगडी, दांडीया, रेकॉर्ड डान्स आदींसह सांस्कृतिक कार्यक्रम रसिकांसाठी खास पर्वणी ठरणार आहेत.

कुंकुमार्चनसह विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहेत. यंदा मंडळाच ३३ व वर्ष असून मोठ्या जल्लोषात नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी मित्रमंडळ सज्ज झालं आहे. यावर्षीच्या उत्सवात सहभागी होऊन दुर्गा मातेच्या सेवेचा लाभ घेण्याच आवाहन बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्या सर्व पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते यांनी केल आहे.

Exit mobile version