Site icon Kokandarshan

औद्योगिक प्रशिक्षण संस्था ओरस यांच्या माध्यमातून किल्ले मनोहर गडावर स्वच्छता मोहीम..

दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे उपस्थितांना गड संवर्धनाचे करण्यात आले मार्गदर्शन

सिंधुदुर्ग,दि.०४: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य आयोजित छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या किल्ले स्वच्छ्ता अभियान उपक्रमाचा एक भाग म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्था ओरोस यांच्या माध्यमातून किल्ले मनोहर गड या ठिकाणी स्वच्छता मोहीम घेण्यात आली.

यावेळी या संयुक्त मोहिमेत दुर्ग मावळा प्रतिष्ठान या दुर्गसंवर्धन संस्थेचे दुर्ग रक्षक उपस्थित होते. तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे मा.प्राचार्य अनिल मोहारे, प्र.गटनिदेशक समीर गोरे, ज्येष्ठ निदेशक तुषार सावंत, गणेश गावडे, राजेश फोंडेकर, सुभाष कविटकर, तासिका निदेशक चिन्मय मुळे, देवेंद्र दळवी, निनाद बांदेकर, जाॅन फर्नांडिस, कर्मचारी राजा चव्हाण, जि.प.कर्मचारी रूपेश सावंत आणि विद्यार्थी उपस्थितीत होते. या मोहिमेस शिवापूर गावाच्या सरपंच सौ शेडगे, उपसरपंच राऊळ, अनिल बांग व शिवापूर ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.

या मोहिमेत गडावर जाणार्‍या रस्त्यावरील झुडुपे स्वच्छ करण्यात आली. तसेच गडावरच्या वाटेवरील आणि लावलेल्या झाडांच्या भोवताली असलेले गवत काढण्यात आले. गडावरील पाषाणाच्या सभोवतालचा परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच आवश्यक ठिकाणी मार्गदर्शक फलक लावण्यात आले. दुर्ग मावळा प्रतिष्ठान च्या वतीने उपस्थितीताना गड किल्ले संवर्धन कार्याची माहिती व मार्गदर्शन करण्यात आले.

Exit mobile version