Site icon Kokandarshan

सुधीर राऊळ यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबिराला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

या शिबिरात १४३ लोकांनी घेतला नेत्र तपासणीचा लाभ..

सावंतवाडी, दि.०३: महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुधीर राऊळ मित्र मंडळ मळगाव आणि सहाय्यक लॉरेन्स अँड मेयो सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार १ ऑक्टोंबर २०२३ रोजी मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव मध्ये ठेवण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिराला लोकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
एकूण १४३ जणांनी या शिबिराचा लाभ घेतला.

यावेळी मनसेचे जिल्हा संघटक अॅड. अनिल केसरकर, प्रशालेचे चेअरमन मनोहर राऊळ, मनसे माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब, प्रशालेचे मुख्याध्यापक मारुती फाले, अॅड. राजू कासकर, सतीश आकेरकर, माजी तालुका अध्यक्ष गुरुदास गवंडे, मळगाव चे सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादि पदाधिकारी सिद्धेश तेंडुलकर, मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर माजी सरपंच निलेश कुडव, दाजी सावंत, सुभाष नाटेकर, सुखदेव राऊळ, पंढरीनाथ गावकर, तुषार वालावलकर, योगेश चिंदरकर, ठाकूर, भजन दशावतार हार्मोनियम वादक बुवा संकेत कुडव, शतायु जांभळे, राकेश परब, साहिल तळकटकर, ओमकार नवार, महेंद्र कांबळी, सिद्धेश सावंत, केतन सावंत, अजित पोळजी, सुदेश राऊळ, अनिकेत दळवी, तुषार पोळजी, प्रथमेश राणे, अक्षय माळकर, संदीप राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version