…अन्यथा ठिय्या आंदोलन करू ग्रामपंचायत सदस्य अभिजीत मेस्त्री, विजय गावडे
सावंतवाडी, दि.३० : चौकुळ-तेरवण- इसापूर ह्या मार्गाचा चौकुळच्या हद्दीपर्यंतचा भाग पुर्णपणे खराब झालेला असून, त्या भागाने ये- जा करणे अथवा वाहतुक करणे पुर्णपणे धोक्याचे व जिवीतास हानी पोहोचवणारे झाले आहे. या गोष्टीस पुर्णतः आपला सार्वजनिक बांधकाम विभागच जबाबदार आहे असा आरो प ग्रामपंचायत सदस्य अभिजीत मेस्त्री व विजय गावडे यांनी केला आहे.
मार्गावर आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी बरीच गावे अवलंबून आहेत. यामध्ये बोरधनगरवाडी, चिखलव्हाळ, बेरडकी, केगदवाडी, इसापूर, तेरवण वरुन चौकुळ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच रस्त्याअभावी ये-जा करणे कठीण बनले आहे. तसेच पर्यटन दृष्ट्या आंबोली, चौकुळ, कुंभवडे ह्या गावांना विशेष महत्त्व आहे. परंतु रस्ता खराब ‘झालेला असल्याने पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे..
तरी सदर रस्त्याचे काम त्वरीत येत्या पंधरा दिवसात पुर्ण करा अन्यथा आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आंदोलन करणार असे लेखी निवेदन यावेळी ग्रामपंचायत सदस्य अभिजीत मेस्त्री, विजय गावडे वैष्णवी गावडे तसेच सामाजिक कार्यकर्ते राजाराम गावडे यांनी दिले आहे. या