चला परिसर स्वच्छ करूया, सुंदर भारत घडवूया.. डॉ.नवांगुळ
सावंतवाडी,दि.०२: केंद्र शासनाच्या स्वच्छता अभियानात रविवारी सावंतवाडी मेडिकल असोसिएशन, रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, रक्तदाता संघटना आणि उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग दर्शवला.
यावेळी उपजिल्हा रुग्णालय परिसर शिल्पग्राम परिसर, सावंतवाडीतील मोती तलाव परिसर आणि आयुर्वेद महाविद्यालय परिसरात स्वच्छता करण्यात आली.
दरम्यान डॉक्टर नवांगुळ यांनी नगरपालिका परिसरात व्याख्यान देत परिसर स्वच्छ करूया सुंदर भारत घडवूया असा संदेश उपस्थितांना दिला.