Site icon Kokandarshan

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या सावंतवाडी तालुका कार्यकारणी अध्यक्ष पदी नामदेव तांबे याची निवड..

…तर उपाध्यक्षपदी सहदेव राऊळ व सचिवपदी श्रीधर राऊळ

सावंतवाडी,दि.०२: महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या सावंतवाडी तालुका कार्यकारणी निवडणुक नुकतीच पार पडली.सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी तळवडे ग्रामसचिवाल्यांचे ग्रामविस्तार अधिकारी नामदेव रामचंद्र तांबे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी सहदेव कृष्णा राऊळ, महिला उपाध्यक्षपदी लीना जगन्नाथ प्रभू, सरचिटणीस श्रीधर नामदेव राऊळ, सरचिटणीस पदी आदम मोहम्मद शहा, कोषाध्यक्ष श्रीरंग अशोक जाधव, संघटक महिला भारती दत्तात्रय चव्हाण ,प्रसिद्धी प्रमुख सीमा लक्ष्मण राऊळ ,कायदेविषयक सल्लागार राजेश रामचंद्र परब यांची निवड करण्यात आली .यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मधुकर घाडी यांनी काम पाहिले तर निरक्षक मदुसुधन बागायतकर, यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संदिप गवस यावेळी उपस्थित होते. यावेळी नूतन कार्य करण्याचे अभिनंदन वरिष्ठांकडून करण्यात आले तसेच त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच मावळत्या अध्यक्षांना पण यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.

Exit mobile version