सुभेदार सुनील सावंत यांचे पार्थिव बघून गाव हळहळला
सावंतवाडी,दि .१६: १९ मराठा लाईट इन्फंट्री बटालियनचे सुभेदार सुनील राघोबा सावंत (४६, रा. कारिवडे भैरववाडी)हे बुधवारी पंजाब येथे परेड सुरू असतना शहीद झाले. त्यांचे पार्थिव शनिवारी कारिवडे या त्याच्या मूळ गावी आणण्यात आले. यावेळी संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला होता.
यावेळी ग्रामस्थ जिल्हा प्रशासन,सैनिक तसेच पोलिसांच्या वतीने गावातील शाळेपासून त्याच्या घरापर्यंत साश्रू नयनात मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी जय जवान जय किसान,सुभेदार सुनील सावंत अमर रहे अमर रहे अशा घोषणा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.पार्थिव घरी पोचताच पत्नीसह मुलांनी नातेवाईकांनी एकच टाहो फोडला यावेळी सर्वाचे मन हेलावून गेले होते.घरी पोचल्यानंतर पार्थिव देहाचे कुटुंबाने अंत्यदर्शन घेतले त्यानंतर पोलिस व सैनिक याच्या बॅडवर अंत्ययात्रा काढत वीर मातेच्या सुपुत्रावर साश्रू नयनांत अंतिम संस्कार करण्यात आले.
सुभेदार सुनील सावंत यांचे युनिट पंजाब मध्ये कार्यरत होते.
पार्थिव देह कारिवडे गावात दाखल झाल्यानंतर शाळेजवळ पार्थिव सैनिकांच्या ट्रक मध्ये ठेवण्यात आले तेथे जिल्हा प्रशासन तसेच कारिवडे सरपंच आरती माळकर यांनी श्रध्दांजली अर्पण केली त्यानंतर शाळे पासून घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीच्या वाटेवर रांगोळी काढण्यात आली होती तसेच सर्वत्र पताका ही लावण्यात आल्या होत्या. मिरवणूकीत शाळकरी मुले ग्रामस्थ माजी सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.तसेच पोलिस जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि सैन्यदलातील अधिकारी ही मिरवणूकीत सहभागी झाले होते.यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या अमर रहे अमर रहे सुनिल सावंत अमर रहे अशा अनेक घोषणा देण्यात येत होत्या.
पार्थिव दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घरी पोचले त्यानंतर कुटुंबाने शहीद सुनिल सावंत याच्या पार्थिव देहाचे अंत्यदर्शन घेतले यावेळी पत्नी मुलगा मुलगी याचा आक्रोश हदय पिळवटून टाकणारा होता.काहि वेळातच पार्थिव अंतिम संस्कारासाठी हलविण्यात आले.
यावेळी जिल्हा प्रशासनाकडून निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी पुष्पचक्र अर्पण केले.तर यावेळी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर तहसिलदार श्रीधर पाटील पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी माजी आमदार राजन तेली प्रविण भोसले वसंत केसरकर महेश सारंग रविंद्र मडगावकर रूपेश राऊळ सुनिल राऊळ मंगेश तळवणेकर आनंद तळवणेकर आदि सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ माजी सैनिक सहभागी झाले होते.