Site icon Kokandarshan

मनसेच्यावतीने येथील कळसुलकर ज्युनिअर कॉलेज मध्ये सायबर क्राईम मार्गदर्शन शिबिर संपन्न…

सावंतवाडी,दि.१२:नागरिकांनी आर्थिक व्यवहार करताना सुरक्षितता व सावधानता बाळगावी सावध तो सुखी असे प्रतिपादन सायबर क्राईम विषयीचे मार्गदर्शक चंद्रशेखर ठाकूर यांनी केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना व मनसे नेते माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या संकल्पनेतून तसेच मनविसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या पुढाकारांतून
सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयःबी .सय्यद कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे सायबर क्राईम मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री चंद्रशेखर ठाकूर यांनी जगभरातील इंटरनेट सेवेमुळे जनतेची फसवणूक करणारे मॅसेज, बनावट फोन कॉल /ई-मेल,ऑनलाईनआर्थिक व्यवहारातील फसवणूक, ए .टी .एम .व डेबिट कार्ड द्वारे होणारी फसवणूक, डिजिटल आर्थिक व्यवहार साक्षरता आणि सावधानता यापासून आपण स्वतःला सुरक्षित कसे राखू शकतो तसेच ‘सावध तो सुखी ‘ या विविध विषयावर सोप्या शब्दात मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉलेज प्रमुख श्री उत्तम पाटील यांनी केले तसेच या कार्यक्रमास उपस्थित राहून प्राचार्य नारायण मानकर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या व या कार्यक्रमाला कळसुलकर शाळेचे माजी विद्यार्थी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थीसेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार निलेश देसाई मनोज कांबळी प्रकाश साटेलकर स्वप्निल जाधव सोनाली परब उपस्थित होते . या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रसाद कोलगांवकर यांनी केले तसेच इयत्ता अकरावी व बारावी कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून सदर कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला व विद्यार्थ्यांही मार्गदर्शक श्री चंद्रशेखर ठाकूर यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनासाठी त्यांचे आभार मानले.

Exit mobile version