Site icon Kokandarshan

आरक्षणाचे महाराष्ट्राच्या मानगुटी वरती बसलेले भूत हे परवडणार नाही..

आर्थिक निकषाच्या आधारावरच आरक्षण द्या.. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

सावंतवाडी,दि.१०: गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात आरक्षणावरून आंदोलने, वादविवाद निर्माण होऊन महाराष्ट्रातील हिंदू हे जातीच्या राजकारणात अडकून पडले आहेत.
आम्ही सगळे हिंदू म्हणतो ज्यावेळी आरक्षणाचा विषय येतो त्यावेळी प्रत्येक जण हे आपापल्या जातीचा बनतो आज महाराष्ट्रामध्ये सर्वच समाजातील जाती-जाती मध्ये प्रचंड असंतोष असून महाराष्ट्र यामध्ये होरपळत आहे. प्रत्येक समाजामध्ये हे पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राला परवडणारी नाही सर्वच राजकीय पक्षाने याचा सखोल विचार करून आर्थिक निकषावरती आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करावे समाजा – समाजामध्ये पडत असलेली दुफळी नष्ट करून जाती-जातीमधील निर्माण झालेल्या भिंती तोडून टाकाव्यात, सर्वच विचारवंताने बुद्धिजीवी टीकाकार यांनी महाराष्ट्र एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न करावा महाराष्ट्र एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न करावा, आरक्षणाचे महाराष्ट्राच्या मानगुटी वरती बसलेले भूत हे महाराष्ट्राला परवडणार नाही.

आपल्या महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचे नागरिक गुण्या गोविंदाने नांदतात ही शांतता अशीच टिकून राहावी यासाठी शासनाने आर्थिक निकषाच्या आधारावर आरक्षण द्यावे असे मत सावंतवाडी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

Exit mobile version