सावंतवाडी,दि.०६: मुंबई,पुणे, कोल्हापूर भागातून गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांना चहा पाण्याची व्यवस्था सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाने केली असून याबाबतचा स्टॉल झाराप- पत्रादेवी राष्ट्रीय महामार्गावर झारा झिरो पॉईंट येथे सुरू करण्यात आला आहे.
सावंतवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई गोवा महामार्गावरून जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी मोफत चहा बिस्किट व पाणी देण्याची सोय झिरो पॉईंट येथे सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत करण्यात आली आहे. यासाठी हा टी स्टॉल उभारण्यात आला आहे या स्टॉलला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज भेट दिली व पाहणी केली या उपक्रमाचे त्यांनी कौतुकही केले दरम्यान हा स्टॉल नामदार रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून उभारण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री कार्यकारी अभियंता किणी यांनी सांगितले यावेळी शाखा अभियंता विजय चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.