Site icon Kokandarshan

श्रीमती रिया सांगेलकर यांना गुरुवंदना राष्ट्र भूषण पुरस्काराने करण्यात आले सन्मानित

सावंतवाडी,दि.०५: तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिरशिंगे नंबर १ मधील पदवीधर शिक्षिका श्रीमती रिया रामनाथ सांगेलकर यांना ०५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून गोवा हिंदी अकादमी गोवा व विद्यार्थी विकास अकादमी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवंदना राष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. याबद्दल गावचे सरपंच दिपक राऊळ उपसरपंच,सचिन धोंड शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पांडुरंग राऊळ, उपाध्यक्षा अभयश्री राऊळ, शिक्षण तज्ज्ञ गणपत राणे,नारायण राऊळ,ज्ञानदेव राऊळ,सदस्य फटू राऊळ,बाबाजी धोंड, आदी सदस्य तसेच शाळा शिरशिंगे नं.१ मुख्याध्यापिका सोनटक्के मॅडम व शिक्षक वृंद,पालक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.

Exit mobile version