Site icon Kokandarshan

जालना मराठा समाज आंदोलन लाठी चार्ज प्रकरणी मंगळवारी सावंतवाडी तहसिलदार यांना देण्यात येणार निवेदन

मराठा बांधवानी ११वाजता तहसिल कार्यालय सावंतवाडी येथे उपस्थित रहावे.. सीताराम गावडे

सावंतवाडी,दि.०४: येथील तालुका मराठा समाजाच्या वतीने मंगळवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी ठीक ११ वाजता जालना येथे झालेला मराठा आंदोलकांवर लाटी चार्ज केल्याचा निषेध व्यक्त करून मराठा समाजाच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी तहसीलदार सावंतवाडी यांना निवेदन देण्यात येणार आहे, तरी सर्व मराठा समाज बांधवांनी ठीक ११ वाजता आरपीडी हायस्कूल येथे उपस्थित रहावे असे आवाहन मराठा समाज सावंतवाडी तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.
५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये एकाच वेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे ,यावेळी बहुसंख्य सदस्य मराठा समाज बांधवांनी जमून हे निवेदन सादर करायचे आहे तरी सर्व मराठा समाज बांधवांनी सावंतवाडी तहसिलदार कार्यालय येथे ठीक ११ वाजता उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version