बांदा,दि.०३: जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली.या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज इन्सुलीच्या वतीने इन्सुली येथे राज्य सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या.
यावेळी मराठा समाज सावंतवाडी तालुकाध्यक्ष सीताराम गावडे, बांदा अध्यक्ष बाळू सावंत, इन्सुली अध्यक्ष नितीन राऊळ, सचिव सुर्या पालव, दिलीप कोठावळे, विनोद गावकर, कास सरपंच प्रवीण पंडित, आकाश मिसाल, विलास जाधव, सचिन पालव, महादेव सावंत, आपा आंमडोसकर, संदीप कोठावळे, किरण गावडे, न्हानू कानसे, अमित सावंत, प्रदीप कोठावळे, मनोहर गावकर, शुभम मुळीक, सुरेंद्र कोठावळे, विजय गावकर, प्रल्हाद सावंत, उल्लास सावंत, गजेंद्र कोठावळे, शिवा सावंत, दिनेश मुळीक, प्रथमेश सावंत, आनाजी देसाई, आदींसह सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बांदा पोलीस उपस्थित होते.