मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत उपसरपंच हेमंत मराठे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत
सावंतवाडी,दि.०२: मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी अमोल चौवरे हे रुजू झाले असून त्यांचे मळेवाड कोंडूरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी स्वागत केले आहे.
मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते मात्र यातील एक महिला वैदिकीय अधिकारी डॉक्टर अदिती ठाकूर या प्रसुती रजेवर गेल्या असून दुसऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी जोशी ह्या पुढील शिक्षणासाठी आपल्या पदाचा राजीनामा देऊन कार्यमुक्त झाले आहेत.यामुळे याठिकाणी तात्काळ वैद्यकीय अधिकारी नेमावा अशी मागणी मळेवाड कोंडूरे उपसरपंच हेमंत मराठे व ग्रामस्थांनी केली होती.आज डॉ अमोल चौवरे हे हजर झाले आहेत.त्यांचे मळेवाड कोंडूरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी सदरचे वैद्यकीय अधिकारी हे तीन महिने मुदत राहिली असून याठिकाणी पुढील बंधपत्रित मधील भरतीत कायमस्वरूपी डॉक्टरना नियुक्ती द्यावी.तसेच दुसऱ्या वैद्यकीय अधिकारी प्रसूती रजेवर गेल्याने त्यां कामावर हजर होईपर्यंत हे पद तात्पुरते भरावे अशी मागणी मराठे यानी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी व तालुका वैद्यकीय अधिकारी शिरोडकर यांच्याकडे केली आहे.