Site icon Kokandarshan

सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या जिल्हास्तरीय आर्चरी (इंडियन) क्रीडा स्पर्धेत श्री माधवराव पवार विद्यालयचे घवघवीत यश

वैभववाडी,दि.०२: दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या जिल्हास्तरीय आर्चरी (इंडियन) क्रीडा स्पर्धेत श्री माधवराव पवार विद्यालय कोकिसरे च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले.

या क्रीडा स्पर्धेत सतरा वर्षे वयोगटात मुलांमधून
निहाल संदीप मोंडकर-द्वितीय. गौरांग अरुण जैतापूर-चतुर्थ.

तर सतरा वर्षे वयोगटात मुलींमधून
चैत्राली चंगाप्पा पाटील-प्रथम
नीतू कुमारी जोगाराम देवासी-चतुर्थ
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी मुख्याध्यापक श्री गोखले सर उपमुख्याध्यापक श्री कदम सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी करूळ हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक श्री जाधव सर उपस्थित होते.
यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक श्री घावरे सर श्री देवकर सर श्री कुलकर्णी सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Exit mobile version