Site icon Kokandarshan

आनंद रासम यांची महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन मुंबई झोन सहसचिव पदी बिनविरोधी निवड…

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर आणि मित्र परिवाराने केला सत्कार

सावंतवाडी,दि.०१: येथील राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने अहिल्या मेडिकल स्टोरचे मालक तसेच राजा शिवाजी चौक मित्र मंडळाचे आनंदीजी रासन यांची महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन मुंबई झोन सहसचिव पदी बिनविरोधी निवड झाल्याबद्दल मंडळाचे सल्लागार व माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी साळगावकर म्हणाले केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे आपण अध्यक्ष झालेले आम्हाला पाहायच आहे त्यासाठी साळगावकरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राजा शिवाजी चौक मित्र मंडळाचे सल्लागार तसेच ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे यांनी त्यांच कार्य व कर्तृत्वाबद्दल आपलं मनोगत व्यक्त करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर व मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये त्यांचा नेहमी सिंहाचा वाटा असतो. या याप्रसंगी रासम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की हे सर्व आपल्या आशीर्वादानेच शक्य झाले. आपण नेहमी सेवाभाव मनात ठेवून प्रत्येक दिवसाची सुरुवात करत असतो यासाठी आपल्या परिवाराची साथ मला नेहमीच मिळते असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, अभय पंडित, मंडळाचे उपाध्यक्ष दिलीप पवार, बंड्या तोरस्कर, अरुण घाडी, सचिव दीपक सावंत, सहसचिव महादेव राऊळ, ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे, रत्नाकर माळी, सोन्या कासार, प्रदीप नाईक उमेश खटावकर रवी जाधव व मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version