म.न.वि.से.जि.आशिष सुभेदार यांनी शहरात वाढती गुन्हेगारी आणि विविध समस्यांबाबत केली चर्चा
सावंतवाडी,दि.३१: येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नूतन डी.वाय.एस.पी सौ संध्या गावडे यांची भेट घेतली.
दरम्यान गणेश चतुर्थी सण काही दिवसांवर येऊन ठेपला असून सणासुदीच्या काळात होणाऱ्या चोरी, घरफोडी तालुक्यात वाहनांच्या होत असलेल्या चोऱ्या यासारखे प्रकार रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी. चोरट्याकडून बंद घरांना लक्ष केले जाते त्यासाठी पोलिसांनी कारवाईचीं मोहीम हाती घ्यावी, अवैध धंद्यावर करडी नजर ठेवावी, तसेच सातोळी बावळट, दाणोली आंबोली मार्गे मोठ्या प्रमाणात गुरांची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत या सर्व बाबींवर सातत्याने कारवाई करण्यात यावी अशी मागणी सावंतवाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नूतन उपविभागीय पोलिस अधिकारी सौ संध्या गावडे यांच्याकडे करण्यात आली.
तसेच तालुक्यासहित शहरात महत्त्वाच्या ठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे बऱ्याच ठिकाणी आढळले आहे. ह्या संदर्भात उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. विदाऊट टी पी होत असलेली अवजड वाहतूक सह जुगार मटक्यासहित अवैद्य धंद्यांना ऊत आला आहे अशा विविध बाबींवर कारवाई करण्याची मागणी डी वाय एस पी गावडे यांच्याकडे मनसे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
यावेळी माजी शहराध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, मंदार नाईक, प्रकाश साटेलकर, निलेश देसाई, नंदू परब, विजय जांभळे, स्वप्निल जाधव, अभि पेंडणेकर, सागर येडगे, रमेश शेळके आदी पदाधिकारी उपस्थित होते.