Site icon Kokandarshan

सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रिक्षा चालकांना बांधण्यात आल्या राख्या..

सावंतवाडी,दि.३०: शहरातील गांधी चौक परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रिक्षा चालकांना राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय अध्यक्ष सौ अर्चना घारे परब यांनी राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.
हिंदू धर्मामध्ये बहीण भावाला राखी बांधून दृष्ट प्रवृत्ती पासून संरक्षण करावे या हेतूने राखी बांधण्याची प्रथा पूर्वंपरागत चालत आलेली आहे.
त्याचाच एक भाग म्हणून आज सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रिक्षा चालक बंधूंना राख्या बांधण्यात आल्या.
यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version