सावंतवाडी,दि.२९: येथील कलंबिस्त इंग्लिश स्कुल सन. १९९८-९९ च्या बॅचमधिल सहकारी मित्रांनी कै.शशिकांत सोमा पास्ते यांच्या कुटुंबाला पडत्या काळात आर्थिक मदतीचा हात दिला आहे.
कै.शशिकांत पास्ते यांचे आकस्मित पणे अलिकडेच निधन झाल्यामुळे त्यांच्या संसारावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.
कै.शशिकांत पास्ते हा शांत संयमी, मनमिळावू स्वभावाचा मित्र व शिक्षक प्रेमी विद्यार्थी होता. त्याच्या घरची परीस्थीती अतिशय बेताची, त्याच्या पश्चात कुटुंबात एक मुलगी, पत्नी, आई, भाऊ असा परिवार आहे. कै. शशिकांत पास्ते हा घरातील कर्ता व कमावता एकमेव असताना त्याच्या जाण्याने कुंटूबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असताना (वर्गमित्र ग्रुप १९९८-९९ च्या बॅच मधील मिञ परिवाराने दातृत्वाच्या भावनेतून, १०,००० चा धनादेश कै. शशिकांत पास्ते यांच्या आईकडे सुपूर्त केला व समाजात मैत्रीच एक अनोखे पाऊल टाकुन समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
खरोखरच या मित्र परिवाराने आपण या समाजाचे आणि मैत्रीचे काही देणे लागतो या सद्भावनेने केलेली मदत खूप लाख मोलाची आहे.
त्यांनी केलेल्या या खऱ्या मदती बद्दल त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.