सावंतवाडी,दि.२६: येथील राजवाड्यात सुरू झालेल्या महिलांच्या रस्सीखेच स्पर्धेत हिरकणी आडेली संघ विजेता ठरला तर उपविजेता सिद्धेश्वर म्हाळाई तळवडे संघ ठरला.
सावंतवाडीतील वाळके मास्तर व्यायाम शाळा, आजी-माजी मित्र मंडळ आणि स्वराज्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार २६ पासून सुरू झालेल्या २ दिवशीय महिला आणि पुरुष यांच्या खुल्या रस्सीखेच स्पर्धेचे उद्घाटन सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले
यावेळी अॅड बापू गव्हाणकर स्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल साटेलकर विठ्ठल कदम बाळ बोंद्रे नाना गवंडळकर कु.साईशा पाटील दिग्विजय पाटील प्रशांत सावंत, संदेश शंकरदास पंच त्रिंबक आजगावकर तातो बांदिवडेकर आदी उपस्थित होते
वाळके मास्तर व्यायाम शाळा आजी-माजी मित्र मंडळ आणि स्वराज्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार २६ व रविवार २७ ऑगस्ट रोजी महिला आणि पुरुष यांच्या खुल्या रस्सीखेच स्पर्धेचेआयोजन करण्यात आले आहे
सुरुवातीला झालेल्या सामन्यांमध्ये हिरकणी आडेली विरुद्ध सिद्धेश्वर म्हाळाई तळवडे संघामध्ये पहिली स्पर्धा झाली यामध्ये हिरकणी संघाने विजय मिळवला नंतर आई माऊली चेदवण संघ विरुद्ध सिद्धेश्वरम्हाळाई तळवडे संघ यांच्यामध्ये दुसरी स्पर्धा झाली यात सिद्धेश्वर म्हाळाई तळवडे संघ विजयी झाला
अंतिम सामन्यात हिरकणी आडेली संघ विरुद्ध सिद्धेश्वर म्हाळाई तळवडे संघामध्ये लढत झाली यात
या स्पर्धेतील विजेत्याला 25 हजार रुपये रोख आणि चषक तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रोख पंधरा हजार आणि चषक तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिक प्रत्येकी पाच हजार रुपये आणि बेस्ट फर्स्ट मॅन, बेस्ट लास्ट मॅन आणि उत्कृष्ट खेळाडूंना रोख पारितोषिके देण्यात येणार आहे या स्पर्धा सावंतवाडी संस्थानच्या राजवाडा येथे होत असून महिला विजेत्यांसाठी अकरा हजार रुपयांचं रोख पारितोषिक आणि चषक देण्यात येणार आहे द्वितीय क्रमांक विजेता पाच हजार रुपये रोख पारितोषिक आणि चषक ठेवण्यात आले आहे
या स्पर्धा वाळके मास्तर जयंतीनिमित्त घेण्यात येणार असून या वेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी चित्तथरारक प्रात्यक्षिके, पुरुष व महिलांच्या मर्दानी खेळाचे ही प्रात्यक्षिक झाले रविवारी सायंकाळी तीन वाजल्यापासून पुरुषांच्या रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे संस्थानच्या राजवाड्यामध्ये शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच साहसी खेळांचे ही प्रात्यक्षिके होणार आहेत तरी याचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल साटेलकर यांनी केले आहे.