Site icon Kokandarshan

मोफत नेत्र तपासणी, चष्मा वाटप व आरोग्य तपासणी शिबिर : ६६८ वाहक व चालकांनी घेतला लाभ

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्गचे आयोजन

सिंधुदुर्ग,दि .२५: उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग मार्फत रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत “मोफत नेत्र तपासणी, चष्मा वाटप व आरोग्य तपासणी शिबिरास ६६८ वाहक व चालकांनी लाभ घेतला. यामध्ये २९१ चालकांना मोफत चष्मा देण्यात येणार आहे. याचे वितरण ओरोस कार्यालय येथे ३१ आगस्ट रोजी चष्मा वाटप ओरोस येथे करण्यात येणार असल्याचे नंदकिशोर काळे यांनी सांगितले.

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड, कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या एसटी डेपोत
एस टी महामंडळाचे वाहन चालक व वाहन, तसेच झाराप येथे खाजगी बस चालक यांनी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन आयोजन करण्यात आले होते.

ओरोस येथे डॉक्टर अमित आवळे मेडिकल ऑफिसर जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या कार्यक्रमात अनंत उचगावकर व डॉ. नेमिनाथ खोत एनएबी आय हाँस्पिटल सावंतवाडी, डॉ. प्रणव अशोक प्रभु ग्लोबल फाऊंडेशन, पिंगुळी आणि अभिजीत पाटील विभाग नियंत्रक MSRTC सिंधुदुर्ग तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग चे सर्व अधिकारी कर्मचारी व जिल्हा रिक्षा संघटना, मोटार ट्रान्सपोर्ट संघटना यांचे पदाधिकारी उपस्थित होते. तपासणी शिबिरात एस महामंडळाचे वाहन चालक व वाहन योग्यता चाचणीसाठी आलेले चालक यांची तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता रस्ता सुरक्षा शपथ घेऊन करण्यात आली.

साईप्रसाद हॉटेल,झाराप येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग मार्फत रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत “मोफत नेत्र तपासणी, चष्मा वाटप व आरोग्य तपासणी शिबिर” सपन्न झाले. यावेळी या तपासणी शिबिरात ९४ खाजगी बस चालक यांची तपासणीत समावेश आहे. यामध्ये मोफत ३९ जनांना मोफत चष्मा वाटप करण्यात येणार आहे.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत २१ ते २५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत जिल्ह‍ात आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.
देवगड, कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या एसटी डेपोत व गोवा, पुणे, मुंबई या मार्गावर चालणाऱ्या झाराप येथे खाजगी प्रवासी बसेसच्या चालकांसाठी झाराप येथे आरोग्य शिबीरास ६६८ वाहक व चालकांनी शिबिराचा लाभ घेतला. यामध्ये २९१ चालकांना मोफत चष्मा देण्यात येणार आहे.

Exit mobile version