Site icon Kokandarshan

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी घेतली भेट…

सिंधुदुर्ग,दि.२४: जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी म्हणून किशोर तावडे यांनी आज पदभार स्वीकारला, यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्ह्यातील जनतेला सतत भेडसावणाऱ्या विविध प्रलंबित सामाजिक प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी लक्ष वेधले,यावेळी जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, कुडाळ तालुका अध्यक्ष शिवाजीराव घोगळे,प्रांतीक सदस्य आत्माराम ओटवणेकर,अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष नझीर भाई शेख, सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, कणकवली तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर,इफ्तिकार राजगुरू,उपस्थित होते.

Exit mobile version