Site icon Kokandarshan

फुटबॉल स्पर्धेत पहिल्या दिवशी “डॅडीज लव पार्से-गोवा” संघाने बी. एफ. सी संघ, बांदाला पराभूत करून उपांत्य फेरीत बाजी मारली..

सावंतवाडी,दि. १६: येथील भाजपा आणि युवा नेते संदीप गावडे यांच्या वतीने आयोजित सावंतवाडी मानसून चषक २०२३ या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत पहिल्या दिवशी “डॅडीज लव पार्से-गोवा” संघाने बी. एफ. सी संघ, बांदाला पराभूत करून उपांत्य फेरीत बाजी मारली. या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार तथा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान पहिल्या दिवशी या स्पर्धेत सिंधुदुर्गसह जिल्ह्याबाहेरील व गोवा राज्यातून असे एकूण १५ संघ सहभागी झाले होते. येथील जिमखाना मैदानावर “डे-नाईट” स्वरूपात सहभागी संघांचे सामने खेळवण्यात आले.
यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा युवराज लखम सावंत-भोसले, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, माजी पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, ॲड. अनिल निरवडेकर, चंद्रकांत जाधव, कृष्णा सावंत, अर्जुन परब, गुरुनाथ कासले, भाऊ कोळंबेकर, दया परब, गौरेश कामत, प्रकाश दळवी, साधना शेट्ये, संजय शिरसाट, माळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर आदिंसह मोठ्या संख्येने भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
दरम्यान पार पडलेल्या पहिल्या फेरीत लाईफस्टाईल मोटिवेटर संघ, कुडाळ, बी. एफ. सी बॉईज बांदा, माडखोल टॅकल्स, सेंट अँथोनी हरंबल, साई वॉरियर्स गोवा, साईयश बार्झन-गोवा, बी. एफ. सी पार्से-गोवा, तर डॅडीज लव पार्से या संघाने प्रतिस्पर्धी संघ शायनिंग बॉईज अनुपस्थित राहिल्यामुळे बाय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या फेरीत चार सामने खेळविण्यात आले. तर तिसऱ्या फेरीत दोन सामने खेळवण्यात आले. या सर्व फेऱ्या पार करत “डॅडीज लव पार्से” आणि बी. एफ. सी. बॉईज बांदा हे दोन संघ उपांत्य फेरीत पोचले. यामध्ये बी. एफ. सी. बॉईज बांदा यांचा पराभव करून “डॅडीज लव पार्से” ने अंतिम सामन्याचा पल्ला गाठला आहे. हा अंतिम सामना १६ ऑगस्टला खेळवला जाणार आहे.

Exit mobile version