Site icon Kokandarshan

धामापूर, मोगरणे येथे सापडली अजून पाच छोटी कातळशिल्पे…

दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागीय अध्यक्ष गणेश नाईक यांची माहिती..

सिंधुदुर्ग,दि.१६: येथील धामापूर, मोगरणे व साळेल येथील सड्यावरील नुकत्याच सापडलेल्या कातळशिल्पांच्या शेजारी अजून पाच छोटी कातळशिल्पे सापडली.

साळेल येथील युवक परेश गावडे, नंदू गावडे, गणेश गावडे यांना काही दिवसांपूर्वीच ते अळंबी शोधण्यासाठी गेले असता धामापूरच्या सड्यावर गोड्याची वाडी हद्दीत दोन कातळशिल्पे आढळून आली होती. पत्रकार सिद्धेश आचरेकर, अनिकेत पाटील यांनी या युवकांसह त्या ठिकाणी जाऊन या कातळशिल्पांची स्वच्छता केली व त्याभोवती दगड रचून ठेवण्याचे कौतुकास्पद काम केले.

या माहितीच्या आधारे श्री लळीत यांनी या परिसरात आणखी काही कातळशिल्पे असण्याची शक्यता लक्षात घेऊन यांच्यासह शोधमोहीम राबवली असता त्यांना या मोहिमेत आणखी काही कातळशिल्पे आढळून आली. त्यात शिकारी माणसाचे कातळशिल्प आढळून आले. याच्या बाजूलाच एका रानडुकराचे कातळशिल्प खोदलेले आहे.
गणेश नाईक, अनिकेत गावडे, प्रसाद पेंडुरकर, नेहा गावडे, सानवी गावडे आदी ही कातळशिल्पे पाहायला गेली असताना गोड्याची वाडी येथे याआधी सापडलेल्या कातळशिल्पाजावळ किल्वर आकाराचे कातळ शिल्प आढळले त्याच बाजूला मातीत बुजलेले एक कातळशिल्प आढळले. त्याची स्वच्छता करण्यात आली. या कातळ शिल्पाच्या पाऊण किलोमीटर अंतरावर असलेल्या मोगरणे गावाकडील कातळ शिल्प शेजारी डॉ लळीत यांना सापडलेल्या डुक्कर व मानवाकृतीच्या शेजारी एक व काही अंतरावर अजून दोन कातळशिल्पे आढळली. ही नवीन कातळशिल्पे सहज दृष्टीक्षेपात यावीत यासाठी कातळशिल्पांची स्वच्छता व सभोवताली दगडांनी रिंगण उपस्थितांनी केले. या कटाळशिल्पांचे संवर्धन व जतन होणे काळाची गरज आहे.

Exit mobile version