Site icon Kokandarshan

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून वन विभाग सावंतवाडी व गवाणकर कॉलेज च्या माध्यमातुन वृक्षारोपण…

सावंतवाडी,दि.१६ : येथील वन विभाग व गवाणकर कॉलेज यांच्या संयुक्त विध्यमाने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नरेंद्र डोंगरावर कोकम, आंबा, जांभूळ, काजू, इ. विविध फळरोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. यासाठी सावंतवाडी वनपरिक्षेत्रातील सर्व अधिकारी, कर्मचारी व गवाणकर कॉलेज चे शिक्षक तसेच ८० विद्यार्थी सहभागी झाले होते.या वृक्षारोपणा नंतर वनपरिक्षेत्र अधिकारी सावंतवाडी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी पर्यावरण संवर्धन, जैवविविधता, तसेच जैवविविधतेचा समतोल अबाधित राहण्यासाठी आपण पार पाडावयाची कर्तव्ये याबाबत संवाद साधला. विद्यार्थी, शिक्षकवृंद यांनीदेखील वन अधिकारी, कर्मचारी यांना त्यांच्या शंका, प्रश्न विचारून त्याचे निरसन करून घेतले. त्यानंतर गवाणकर कॉलेजच्या विद्यार्थी व शिक्षक यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Exit mobile version