राजन तेलींच्या हस्ते उद्घाटन; सायंकाळी असणार पालकमंत्री ना.चव्हाण यांची उपस्थिती
सावंतवाडी,दि.१५: भारतीय जनता पार्टीचे युवा नेते संदीप गावडे यांनी सावंतवाडी येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मान्सून फुटबॉल स्पर्धेतून नामवंत खेळाडू निर्माण होतील असा विश्वास भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केला ते सावंतवाडी चिमखाना मैदान येथे आजपासून सुरू झालेल्या फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
मान्सून फुटबॉल स्पर्धेमध्ये त्यांच्या हस्ते दीपप्रजनाने स्पर्धेचे उद्घाटन झाले यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा युवराज लखम सावंत-भोसले, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, माजी पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, ॲड. अनिल निरवडेकर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार भाजपा पत्रकार सिताराम गावडे जय भोसले सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर,अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, कृष्णा सावंत, अर्जुन परब, गुरुनाथ कासले, भाऊ कोळंबेकर, दया परब, गौरेश कामत, प्रकाश दळवी, साधना शेट्ये, संजय शिरसाट, मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, अमेय तेंडोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
भाजपचे युवा नेते संदीप गावडे माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन कार्यक्रमास सावंतवाडी संस्थानाचे युवराज लखम सावंत भोसले यांनी शुभेच्छा दिल्या भव्य दिव्य अशी ही स्पर्धा असून अशा स्पर्धा सावंतवाडीत होत असल्याबद्दल त्यांनी कौतुकोद्गार काढले
भारतीय जनता पार्टीचे युवा नेते माजी पंचायत समिती सदस्य आणि माजी मंडल अध्यक्ष संदीप दादा. गावडे यांच्या माध्यमातून येथील जिमखाना मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनात प्रास्ताविकात काहीतरी नवा उपक्रम करण्याच्या हेतूने ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले तर भविष्यात याहीपेक्षा भव्य दिव्य अशी स्पर्धा होईल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला यावेळी प्रमुख अतिथी सह पंच आयोजका ंना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला दोन दिवशीय मान्सून फुटबॉल स्पर्धेची सुरुवात खेळाडूंना शुभेच्छा देऊन आणि राजन तेली यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आज उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम धुरी यांनी केले तर जुने पंच व खेळाडूंचा गौरव संदीप गावडे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला
या स्पर्धेला सायंकाळी पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण उपस्थित राहणार असल्याचे राजन तेली यांनी यावेळी बोलताना सांगितले.