सावंतवाडी,दि.१२: सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा सावंतवाडी अर्थात कळसुलकर प्राथमिक शाळेचे सहाय्यक शिक्षक श्री धोंडी गंगाराम वरक यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे २०२३ या वर्षासाठी आयोजित केलेल्या सहाय्यक प्राध्यापक पात्रता (SET) परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केले आहे. श्री वरक यांनी मराठी विषयांमधून पुणे विद्यापीठाची सेट परीक्षा पात्र केली आहे. या अगोदर त्यांनी मराठी विषयातून पदवी नंतर पदव्युत्तर शिक्षण,डीएड, बीएड अशी शैक्षणिक पात्रता धारण केलेली आहे. त्यांच्या या शैक्षणिक गुणवत्ते बद्दल शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे कौतुक होत आहे.