Site icon Kokandarshan

आंबोलीत बेळगावी इन्डूरन्स स्पोर्ट्स क्लब ‘मॅरेथॉन” धावकांचे पोलीस व तालुका पत्रकार संघांने केले स्वागत..

सावंतवाड़ी,दि.०७: धुक्याची दुलाई ,रिमझिम पडणारा पाऊस, पहावे तिकडे डोळ्यांना सुखावणारे हिरव्या गालीच्याने नटलेले डोंगर यातून जाणारा ,वळणारा ओला रस्ता पण मंद वाऱ्याने जाणवणारा सुखद गारवा अशा उत्साही करणाऱ्या वातावरणात रविवारी (दि.६) कर्नाटक राज्यातील बेळगावी इन्डूरन्स स्पोर्ट्स क्लब ‘मॅरेथॉन” स्पर्धेची सांगता आंबोली मुख्य धबधब्याजवळ सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि जिल्हा पोलीस विभागाच्या हस्ते मॅरेथॉन धावपटूंचा सत्कार करून झाली.
बेळगांव चे उद्योजक अमान नदाफ आणि पत्रकार मनोज कालकुंद्रीकर यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.बेळगाव येथून रविवारी भल्या पहाटे ५ वाजता मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. बेळगावचे पोलादी पुरुष अशी ओळख असणारे संतोष शानबाग यांच्या हस्ते झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली काहीसे धुके अधून मधून पडणा-या रिमझिम पावसात धावपटूंचे मार्गक्रमण करीत होते या ६०धावपटू मध्ये बेळगांव चे शासकीय अधिकारी, कर्मचारी, पत्रकार सहभागी झाले होते. तब्बल ६५ किलोमीटर अंतर धावपटुनी ८ तासात पार केले. स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी भर दुपारी कोसळणाऱ्या पावसातही महिला पोलीस निरीक्षक रिजवाना नदाफ, पोलिस हेड कॉन्स्टेबल दत्ता देसाई , सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार उपाध्यक्ष विजय राऊत, काका भिसे, नरेंद्र. देशपांडे ,कुडाळ तालुका पत्रकार संघाच्या उपाध्यक्ष वैशाली खानोलकर,आणि पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Exit mobile version