सावंतवाडी,दि.०२: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील बुथ अध्यक्ष यांची बैठक माजी मंत्री प्रवीण भाई भोसले व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ अर्चना घारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली.
सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यातील बहुसंख्य बूथ अध्यक्ष या वेळी उपस्थित होते. या बैठकीमध्ये बूथ कमिटीची रचना, सोशल मीडियाचा प्रभावी वापर व आपत्कालीन परिस्थितीमध्ये बूथ कमिटीने करावयाचे काम याबाबत प्रामुख्याने चर्चा झाली.
यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले म्हणाले की ,”कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो. पार्टीचा बूथ कमिटी अध्यक्ष हा नागरिक व पक्ष यांमधील समन्वय साधनारा दुवा असतो. पार्टीच्या संघटनात्मक रचनेमध्ये बुथ कमिटीला विशेष महत्त्व आहे. बूथ कमिटीची रचना, बूथ कमिटीचे काम, यावरच यापुढील काळातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील पक्षाची वाटचाल असणार आहे.
सध्या सुरू असलेला पाऊस आणि दोडामार्ग ते सावंतवाडी प्रवासाचे अंतर याचा विचार करून दोडामार्ग तालुक्यातील बूथ अध्यक्ष या बैठकीला मुद्दामच बोलाविले नव्हते. थोड्याच दिवसात दोडामार्ग तालुक्यात देखील बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे या वेळी सौ. अर्चना घारे यांनी सांगितले.
या बैठक प्रसंगी महिला जिल्हाध्यक्ष ॲड.रेवती राणे, युवक जिल्हाध्यक्ष विशाल जाधव, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, महिला अध्यक्ष सौ. दीपीका राणे, महिला शहराध्यक्ष ॲड सौ. सायली दुभाषी, तालुका सरचिटणीस हिदायतुल्ला खान, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सिद्धेश तेंडुलकर, शहर चिटणीस राकेश नेवगी, वेंगुर्ला तालुका कृषी सेलचे अध्यक्ष बाबा टेमकर, जिल्हा उपाध्यक्ष अशिफ शेख, अल्पसंख्याक सावंतवाडी तालुकाध्यक्ष जावेद शेख, सावंतवाडी तालुका नूतन युवक अध्यक्ष जय गणेश गावकर, उपाध्यक्ष विवेक गवस, अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष जहुर खान, अल्पसंख्याक सेल महिला अध्यक्ष राबिया शेख-आगा, चराठा ग्रामपंचायत सदस्य गौरी गावडे, तुळस गावचे अध्यक्ष अवधूत मराठे, बबन पडवळ, उमेश आळवे, कुणाल बिडीये आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बुथ अध्यक्ष उपस्थित होते.