उपसरपंच भरत गावकर यांची एसटी प्रशासनाकडे मागणी… अन्यथा ठिय्या आंदोलन..
सावंतवाडी,दि .०१: सोनुर्ली गावात सोडण्यात येणाऱ्या सव्वा अकराच्या बसच्या वेळेत बदल करुन कॉलेज विद्यार्थ्यांची होणारी पायपीट थांबवा, अन्यथा विद्यार्थाना घेऊनच स्थानकात ठिय्या आंदोलन छेडू असा इशारा सोनुर्ली उपसरपंच भरत गावकर यांनी सावंतवाडी बस स्थानकाचे आगार व्यवस्थापक श्री शेवाळे यांना दिला. याबाबतचे निवेदनही त्यांनी सादर केले.
सोनुर्ली गावासाठी येथील बस स्थानकामधून सुटणारी सव्वा बाराची बस कोरोना काळापासून बंद करण्यात आली या बसचा फायदा सावंतवाडी मध्ये कॉलेज साठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना होत होता विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता ही बस फेरी त्यावेळी सुरू करण्यात आली होती परंतु गेले दोन वर्ष होऊन जास्त काळ ही बस बंद असल्याने शालेय विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे गावामध्ये सकाळी बसस्थानकातून सुटणारी सव्वा बाराची बसनंतर दुपारी सव्वादोन वाजता दुसरी बस आहे मात्र या मधल्या वेळेत एकही बस नसल्याने काॅलेज विद्यार्थ्यांना शिरोडा किंवा रेडी बसचा आधार घेऊन न्हावेलीपर्यंत प्रवास करावा लागतो. तेथून तब्बल पाच किलोमीटर दररोज पायपीट या विद्यार्थ्यांना करावी लागते गेले दीड वर्ष यासंदर्भात एसटी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे लेखी निवेदने विद्यार्थ्यांच्या सह्यांची मोहीम घेऊन सुद्धा एसटी प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या समस्येची जाणीव होत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालक वर्ग आणि ग्रामस्थांमधूनही नाराजी व्यक्त होत आहे.
सावंतवाडीत येणाऱ्या सोनुर्ली गावातील विद्यार्थ्यांना सव्वा अकरा वाजता सोडण्यात येणारी बस फेरी चुकत असल्याने त्यांना तब्बल दोन ते तीन तास स्थानकामध्ये बसून राहण्याची पाळी येते त्यामुळे सव्वा अकरा वाजता सोडण्यात येणाऱ्या बसचा वेळ बारा केल्यास त्याचा फायदा कॉलेज विद्यार्थ्यांना होणार आहे कारण साडेअकरा वाजता कॉलेज सुटत असल्याने या बस फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे याच संदर्भात आज सोनुली उपसरपंच श्री गावकर यांनी अगार व्यवस्थापक श्री शेवाळे यांची भेट घेत त्यांना वस्तुस्थिती पटवून दिली शिवाय येत्या आठ दिवसात यासंदर्भात निर्णय न्याय झाल्यास आपण विद्यार्थ्यांना घेऊन स्थानकातच ठिय्या आंदोलन छेडू असा इशारा दिला. दरम्यान येथे आठ दिवसात हा प्रश्न मार्गी लावू असा शब्द श्री शेवाळे यांनी गावकऱ दिला.