Site icon Kokandarshan

भाजपा माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या शुभ हस्ते मळेवाड कुंभारवाडी अंगणवाडी नूतन इमारतीचा करण्यात आला शुभारंभ..

सावंतवाडी,दि .३०: मळेवाड कुंभारवाडी अंगणवाडी नूतन इमारतीचा शुभारंभ भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या शुभ हस्ते फीत कापून व दीप प्रज्वलन करुन करण्यात आला.
मळेवाड कुंभारवाडी येथील अंगणवाडी इमारतचा स्लॅप बांधकाम जीर्ण झाल्याने या ठिकाणी धोका निर्माण झाला होता.यामुळे नवीन इमारत करीता निधी मिळावा यासाठी मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे यांनी राजन तेली यांच्याकडे मागणी केली होती.त्यानुसार डोंगरी विकास योजनेअंतर्गत मळेवाड कुंभारवाडी अंगणवाडीच्या नूतन इमारतीसाठी बारा लाख तीस हजार रुपयांचा निधी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून राजन तेली यांनी उपलब्ध करून दिला होता.या निधीतून मळेवाड कुंभारवाडी येथे नव्याने अंगणवाडी इमारत उभारण्यात आली होती आज या इमारतीचा शुभारंभ भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांच्या शुभहस्ते फीत कापून व दीप प्रज्वलित करून करण्यात आला.यावेळी आपले मनोगत व्यक्त करत असताना ग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधव यांनी गावाच्या विकासासाठी राजन तेली निधी उपलब्ध करून देत असल्याबद्दल त्यांचे आभार मानले.तसेच लाडोबा केरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना गावाचा विकास होत असताना निधी मिळणे हे फार गरजेचे असते.मात्र ती गरज लक्षात घेऊन नेहमी पाठपुरावा केल्याने या ठिकाणी निधी उपलब्ध होऊन आज नव्याने इमारत उभी झाली.याबद्दल राजन तेली आणि ग्रामपंचायत सरपंच व सर्व सहकाऱ्यांचे कौतुक केले.विकास नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना गावाच्या विकासासाठी येत असलेला कोट्यावधी निधीबद्दल ग्रामपंचायत सरपंच व सर्वांचे कौतुक करत असताना राजन तेली यांनी हा निधी देण्यासाठी केलेले सहकार्य हे लाख मोलाचे असून भविष्यातील यांनी असेच सहकार्य करावे असे आवाहन नाईक यांनी तेली यांना केले.या शुभारंभ प्रसंगी ग्रामविकास अधिकारी अनंत गावकर,अंगणवाडी सेविका संगीता माळकर,मदतनीस मंजिरी कुंभार,व पत्रकार मदन मुरकर यांचा तेली यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच गावासाठी व अंगणवाडीच्या इमारतीसाठी विकास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल गावाच्या वतीने राजन तेली यांचा ताता कुंभार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.या सत्कार नंतर आपले मनोगत करत असताना राजन तेली यांनी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या योजना आहेत त्याची माहिती देत असताना याचा लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.तसेच निधी देत असताना वेगवेगळ्या स्वरूपाची कामे देणे अपेक्षित असतं. त्यालाच अनुसरून मळेवाड कोंडुरे गावातील कामे सुचवली असून त्यासाठी भविष्यातही निधी देण्याचे आश्वासन दिले.तसेच मळेवाड कुंभारवाडी येथील कुंभारवाडी ते गणेश मांड रस्त्याचे डांबरीकरणासाठी आपण प्राधान्य क्रमाने या ठिकाणी निधी उपलब्ध करून देईन असाही शब्द ग्रामस्थांना दिला.गावाच्या विकासासाठी आणि निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपले नेहमीच सहकार्य असेल. तसेच आपलेही सहकार्य आम्हाला असू द्या असे आवाहन उपस्थिताना तेली यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच हेमंत मराठे यांनी करत असताना गावात विकास कामांसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे,पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आलेल्या निधीची रक्कम विशद केली.कार्यक्रमाच्या समारोपाला अध्यक्ष म्हणून भाषण करत असताना सरपंच मिलन पार्सेकर यांनी अंगणवाडीतील मुले ही झाडासारखी असतात जसे आपण झाडाचे संगोपन करून त्याचे वटवृक्षात रूपांतर करतो तसेच संगोपन या मुलांचे करून त्यांना चांगले शिक्षण,चांगले संस्कार करून चांगला समाज व व्यक्ती बनण्यासाठी त्याना ज्ञानदान करावे असे आवाहन केले.तसेच गावाचा विकास करत असताना आम्ही आमच्या परीने गावाच्या विकासासाठी प्रयत्न करत असून ग्रामस्थांनी ज्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलेले आहे तसेच सहकार्य कायमस्वरूपी ठेवा.आम्ही गावाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत असे आश्वासित केले.या शुभारंभ प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक,सदस्य स्नेहल मुळीक,सदस्य गिरिजा मुळीक सदस्य कविता शेगडे,सदस्य अर्जुन मुळीक,सदस्य महेश शिरसाठ तंटामुक्ती अध्यक्ष अमित नाईक, पोलीस पाटील दिगंबर मसुरकर,ग्राम विकास अधिकारी अनंत गावकर,दाजी सावळ,गजानन शिरसाट,दादा मोरुडकर,रामचंद्र नाईक,रवींद्र मुळीक,नंदू नाईक,तलाठी संदीप मुळीक,महेश कुंभार,नाना कुंभार,गणेश कुंभार,लवू सातार्डेकर,तसेच बचत गट सीआरपी,अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा सेविका,पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version