सावंतवाडी,दि.२९: येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरमळे शितप या प्रशालेत भाजपा युवा नेते माजी पंचायत समिती सदस्य श्री संदीप गावडे यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत साजरा करण्यात आला.
आपल्या वाढदिवसानिमित्त श्री संदीप गावडे यांनी येथील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
यावेळी मनीष परब प्रशालेतील शिक्षक शितप वाडीतील ग्रामस्थ व संदीप गावडे फाउंडेशन चे सदस्य उपस्थित होते.