Site icon Kokandarshan

मळेवाड,कोंडूरे गावासाठी मिळणार पाच विशेष कार्यकारी अधिकारी …हेमंत मराठे यांनी दिली माहिती.

सावंतवाडी,दि.२९: गेले कित्येक दिवस विशेष कार्यकारी अधिकारी ही पदे रिक्त होती.यामुळे शेतकरी व विद्यार्थ्याना कागद पत्रांची झेरॉक्स प्रत सत्यप्रत करताना फार मोठे समस्या निर्माण होत होती.यामुळे भाजपच्या सर्वच कार्यकर्त्यांकडून व पदाधिकाऱ्यांकडून लवकरात लवकर विशेष कार्यकारी अधिकारी पदे भरावी अशी मागणी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे करण्यात आली होती.त्यालाच अनुसरून विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणुका देण्यात आल्या आहेत.यात मळेवाड कोंडुरे गावासाठी पहिल्यांदाच पाच विशेष कार्यकारी अधिकारी पदे देण्यात आली आहेत.यामध्ये लाडोबा केरकर,विजय चराटकर,प्रमोद मुळीक,अमित नाईक,भिवसेन मुळीक यांचा समावेश आहे.तसेच मळेवाड जिल्हा परिषद मतदार संघात एकूण सोळा विशेष कार्यकारी अधिकारी पदे देण्यात आलेली आहेत.विशेष कार्यकारी अधिकारी पदे भरल्याने आता कागदपत्रांची झेरॉक्स प्रतची सत्यप्रत करण्यासाठी येणारी समस्या सुटणार आहे.विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पाच व्यक्तींचा समावेश केल्याबद्दल मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण,भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली, तसेच भाजप बांदा मंडल तालुका अध्यक्ष महेश धुरी यांचे आभार मानले आहेत.

Exit mobile version