Site icon Kokandarshan

कवठणी सतीची वाडी येथे भर वस्तीत विहिरीत पडला बिबट्या…

सावंतवाडी,दि २८ : तालुक्यातील कवठणी सतीचीवाडी येथे भरवस्तीत उमेश कवठणकर यांच्या घराजवळील विहिरीत बिबट्या पडल्याचे आढळून आले आहे.
भक्ष्याच्या शोधात पहाटेच्या सुमारे हा बिबट्या पडला असावा अशी माहिती येथील सरपंच अजित कवठणकर व श्याम नाईक यांनी दिली आहे.
भर वस्तीत बिबट्याचा संचार आढळून आल्याने येथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरपंच अजित कवठणकर यांनी वन विभागाला कळवले असून वन विभागातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Exit mobile version