Site icon Kokandarshan

एक “छत्री” गरजू विद्यार्थ्यासाठी… दुर्ग मावळा प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम..

सिंधुदुर्ग,दि.२४: दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागामार्फत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओवळीये, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पिंगुळी नं १, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुळास बांबरवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साळगाव येथील २० गरजू विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले.

यामध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओवळीये येथील ९ विद्यार्थ्यांना, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पिंगुळी नं १ शाळेतील ९ विद्यार्थ्यांना, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुळास बांबरवाडी येथील १ विद्यार्थ्यांला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साळगाव येथील १ विद्यार्थ्यांला दुर्ग मावळा परिवारातर्फे छत्रीचे वाटप करण्यात आले. या छत्री वाटप उपक्रमासाठी प्रिती सावंत यांनी ५ छत्र्या, भालचंद्र आजगांवकर यांनी ३ छत्र्या, हरी वेंगुर्लेकर यांनी २ छत्र्या, नेहा नरेंद्र सावंत यांनी २ छत्र्या, दिनकर परब यांनी २ छत्र्या, सुधीर गुंजाळ यांनी १ छत्री, राहुल सूर्यकांत धुरी यांनी ३ छत्र्या, किरण परब यांनी २ छत्र्या सौजन्य केले. सर्व दात्यांचे दुर्ग मावळा परिवाराकडून आभार मानण्यात आले.

Exit mobile version