Site icon Kokandarshan

आंबोली,गेळे येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय स्कूल उभे करण्यात येणार…

मंत्री दीपक केसरकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली जागेची पाहणी

सावंतवाडी,दि.१० : आंबोली गेळे येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय स्कूल उभे करण्यात येणार असून या जागेची पाहणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी अधिकाऱ्यांसमवेत केली.
यावेळी मंत्री केसरकर यांनी अजून एक दोन जागा बघितल्यानंतर जागेचा अंतिम निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी व्ही.एन.नाईक गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके,आंबोली सरपंच सावित्री पालेकर,संतोष पालेकर,विलास गावडे, जिल्हाप्रमुख अशोक दळवी तालुका बबन राणे आदि उपस्थित होते.
लोणावळा पाचगणी च्या धरतीवर आंबोली येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे नेताजी सुभाष चंद्र बोस स्कूल उभे करण्याचा मंत्री केसरकर यांचा मानस आहे पर जिल्ह्यातून विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यासाठी येतील तसेच ते येथेच राहतील यासाठी आंतरराष्ट्रीय स्कूल बरोबरच निवास व्यवस्था ही करण्यात येणार आहे या कामाला तब्बल ३१ कोटीचा निधीही शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे.
या शाळेचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे या दृष्टीने मंत्री केसरकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत गेळे येथील जागेची पाहणी केली मात्र गेळे येथील जागेवर अद्याप पर्यंत एकमत झाले नाही. त्यामुळे आणखी दोन ते तीन जागेची मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांना पाहाणी करण्यास सांगण्यात आले असून मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा अहवाल शासनाला प्राप्त झाल्यानंतर जागेबाबत निश्चिता होईल असे मंत्री केसरकर यांनी सांगितले.
दरम्यान मंत्री केसरकर यांचा गेळे येथील शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी मुलांना ही केसरकर यांच्या हस्ते पुस्तके देण्यात आली.

Exit mobile version