Site icon Kokandarshan

सालईवाड्यात मोरी खचल्याने रस्यावर अपघात होण्याची भीती…

तात्काळ दुरूस्ती करा; प्रतिक बांदेकर यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी…

सावंतवाडी,दि.१०: सालईवाडा भागात विजयालक्ष्मी काॅम्पलेक्सला लागून असलेल्या नाल्यावरील फरश्या फुटून रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी या गटाराची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी, मागणी शिवसेनेचे युवा कार्यकर्ते प्रतीक बांदेकर यांनी केली. याबाबत त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना निवेदन देऊन लक्ष वेधले आहे.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version