एस. एम. देशमुखांच्या हस्ते गौरव; जिल्ह्यात संघटना वाढविण्याच्या पदाधिकाऱ्यांकडून सूचना…
सावंतवाडी, दि.२१: महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेत सिंधुदूर्ग जिल्हा डीजीटल मिडिया सेलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ब्रेकींग मालवणीचे संपादक अमोल टेंबकर यांचा पिंपरी-चिंचवड येथे मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या राष्ट्रीय अधिवेशनात सन्मान करण्यात आला. यावेळी सिंधुदूर्गात संघटना वाढण्यासाठी प्रयत्न करा, असे सांगून उपस्थित पदाधिकार्यांनी टेंबकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी सिंधुदूर्ग पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, माजी राज्याध्यक्ष गजानन नाईक, प्रसिद्धीप्रमुख हरिश्चंद्र पवार, नरेंद्र देशपांडे, नंदकिशोर महाजन, माजी जिल्हाध्यक्ष विकास गांवकर,कोकण दर्शनचे मिडियाचे आनंद धोंड,कोकणभूमिचे शैलेश मयेकर, ब्रेकिंग मालवणीचे शुभम धुरी,दै. नवराष्टचे नरेंद्र देशपांडे आदींसह मोठ्या संख्येने मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी, सदस्य व राज्यभरातील पत्रकार उपस्थित होते.