आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांची माहिती
सावंतवाडी,दि.०४: आंबोली गेळे कबुलायतदार प्रश्न अखेर मार्गी लागला.
आज झालेल्या कॅबिनेट मध्ये निर्णय झाला असुन आता आंबोली आणि गेळे येथील रहिवाशांना याचा फायदा मिळणार आहे अशी माहिती आंबोली सरपंच सौ. सावित्री पालेकर यांनी दिली
यासाठी भाजपा जिल्हा अध्यक्ष राजन तेली,शिक्षण मंत्री दिपक केसरकर व पालकमंत्री श्री.रविंद्र चव्हाण यांनी वेळोवेळी सहकार्य करून पाठपुरवठा केला असे म्हणत सरपंचांनी सर्वांचे आभार मानले.