Site icon Kokandarshan

सावंतवाडी बस स्थानक परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य…

याला नेमका जबाबदार कोण..? माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा सवाल

सावंतवाडी, दि.३०: येथील शहराच्या एसटी बस स्थानकाची अवस्था पाहता याला नेमका जबाबदार कोण…? असा सवाल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी उपस्थित केला आहे.

येथील बस स्थानक परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्या असून पावसाचे पाणी खड्ड्यामध्ये साचल्याने तेथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठी कसरत करून चालावे लागत आहे. तसेच बस चालकांना ही कसरत करावी लागत आहे.
मात्र येथील लोकप्रतिनिधी, मंत्री, संबंधित प्रशासन यांचा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन बस स्थानक परिसराची डागडुजी करावी जेणेकरून प्रवासी आणि विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास होणार नाही. अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी संबंधित विभागाकडे केली आहे.

Exit mobile version