Site icon Kokandarshan

ओटवणे मांडवफातरवाडी येथे संकल्प सेवा संघामार्फत साकारण्यात आलेल्या प्रवासी शेडचे करण्यात आले उद्घाटन..

सावंतवाडी,दि.२९: ओटवणे मांडवफातरवाडी येथील युवकांनी एकत्र येत संकल्प सेवा संघाची स्थापना केली. सामाजिक जाणिवेतून या संकल्प सेवा संघाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. याच संघाच्या संकल्पनेतून मांडवफातरवाडीत साकारलेल्या प्रवासी शेडचे उद्घाटन करण्यात आले.
ओटवणे येथील मुंबईस्थित उद्योजक सुरेश तावडे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून आणि सरपंच आत्माराम गावकर यांच्याहस्ते फीत कापून या प्रवासी शेडचे उद्घाटन करण्यात आले. संकल्प सेवा संघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी यासाठी स्वतः मेहनत घेऊन तसेच स्वतः आर्थिक योगदान देऊन ही प्रवासी शेड साकारली. गावात प्रथमच प्रवासी शेड साकारल्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजाराम वर्णेकर, ओटवणे गावठणवाडी मंडळाचे अध्यक्ष उमेश गावकर, प्रकाश पनासे, ग्रामपंचायत सदस्य महेश परब, अस्मिता भगत आदीसह युवक, युवती, महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सुरेश तावडे, आत्माराम गावकर, उमेश गावकर यांनी संकल्प सेवा संघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीतून साकारलेल्या या प्रवासी शेडचे कौतुक करीत संकल्प सेवा संघाची ही सेवा अनुकरणीय व उपयुक्त समाजकार्य असल्याचे सांगितले.

Exit mobile version