Site icon Kokandarshan

पत्रकार संरक्षण समिती सिंधुदुर्गच्या वतीने श्री देव काळोबा मंदिर, मळेवाड येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न…

सिंधुदुर्ग,दि.२८: पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र च्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड येथील श्री देव काळोबा मंदिर परिसरात बेल व सोनचाफा या रोपांचे आज वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी पत्रकार संरक्षण समिती सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रसाद मडगांवकर, जिल्हा संघटक जाफर शेख, जिल्हा उपखजिनदार मदन मुरकर, महिला सदस्या श्रीमती सिमंतीनी मयेकर यांच्यासह मळेवाड व्यापारी संघटना अध्यक्ष पांडुरंग गावडे, उपाध्यक्ष रमाकांत नाईक, ज्येष्ठ नागरिक वसंत नाईक, भाऊ मुरकर अतुल मुरकर, आशिष मुरकर, रवींद्र तळवणेकर,एकनाथ गावडे, संतोष गावडे, देऊ शिरसाट, विशाल नाईक यांच्यासह मळेवाड गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version