Site icon Kokandarshan

गेल्या ६८ वर्षात भारतात सरकारतर्फे वड, पिंपळ, कडुलिंब ही झाडे लावणे पूर्णपणे बंद झाली आहेत….

...जर झाडे लावायची असतील तर फक्त्त देशी झाडेच लावा.. दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे आवाहन

सिंधुदुर्ग,दि.२६: सामाजिक वनीकरणात सुबाभुळ (आकेशिया ), गुलमोहोर, निलगिरी अशी विदेशी झाडे लावली गेली. ही विदेशी झाडे कधीही इथल्या जैवविविधतेशी जुळवून घेऊ शकत नाहीत. या झाडांचा आपल्या पक्षी, किटकं, बुरशी, जमिनीतील जीवाणू ह्यांना उपयोग नसतोच तर अपायच असतो. ही झाडे आपल्या जमिनीतील खूप पाणी खेचून यांच्या पानाचे आपल्या जमिनीत विघटन होत नाही त्यामुळे झाडाखालची जमीन नापीक होते. आपले वड, पिंपळासारखे देशी वृक्ष इथल्या जैवविविधतेला पाठिंबा करतात. पक्षी, प्राणी, किटके, बुरशी आणि सगळे जीवजंतू यांच्यावर जगतात. पिंपळ १००% , वड ८०% तर कडुलिंब ७५% कार्बन डाय आँक्साइड शोषून घेते. म्हणून जर झाडे लावायची असतील तर फक्त्त देशी झाडेच लावा आणि आपले पर्यावरण वाचवा. असे आवाहन दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.

Plant Indian Trees : बहावा, देवचाफा, खरा अशोक, तामण, वड, पिंपळ, कडुलिंब.

ही माहिती महत्वाची आहे कारण पाऊस सुरू झाला आहे….

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version