Site icon Kokandarshan

विद्यार्थ्यांना लागणाऱ्या दाखल्या संदर्भात सहकार्य करावे..

सावंतवाडी मनसे शिष्टमंडळाची तहसीलदार पाटील यांच्याकडे मागणी..

सावंतवाडी,दि.२३ : विद्यार्थ्यांच्या नवीन वर्षाचे प्रवेश सुरू झाले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना लागणाऱ्या कोणत्याही दाखल्या संदर्भात किंवा शासकीय कामां संदर्भात प्रशासनाने त्वरित सहकार्य करावे जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना कोणतेही अडथळे येणार नाहीत व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने वतीने वि.से. जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी केली श्री पाटील यांची सावंतवाडी तहसीलदार पदी कायमस्वरूपी नियुक्ती झाल्यानंतर मनसेच्या वतीने त्यांनी स्वागत केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सावंतवाडी तालुक्यातील विविध समस्या पदाधिकाऱ्यांकडून मांडण्यात आल्या तर श्री पाटील यांनी त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला यावेळी म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार उपजिल्हाध्यक्ष कौस्तुभ नाईक निलेश मुळीक शुभम घावरे प्रमोद तावडे मनोज कांबळी प्रणित तळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version