सावंतवाडी,दि.१४:तहसीलदार श्रीधर पाटील यांनी आज सावंतवाडी तहसील कार्यालयाचा आपला कार्यभार स्विकारला.
दरम्यान कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी नायब तहसीलदार मनोज मुसळे, श्रीमती कासकर, अव्वल कारकून श्री स्वप्निल प्रभू, श्री मेस्त्री, मंडळ अधिकारी श्री गुरव,
तलाठी श्री गजीनकर,कोदे, गिरप व कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते.