Site icon Kokandarshan

वारकऱ्यांवर पोलिसांकडून झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी च्या वतीने उद्या सावंतवाडीत मोर्चा…

सावंतवाडी,दि.१३: आळंदी येथे वारकऱ्यांवर पोलिसांकडून झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी च्या वतीने उद्या बुधवार दि. १४ जून २०२३ रोजी सकाळी ११वाजता सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिर ते तहसीलदार कार्यालयापर्यंत धिक्कार मोर्चा काढण्यात येणार आहे. तरी सावंतवाडी तालुक्यातील सर्व उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. तसेच या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायातील वारकरी व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केले आहे.

Exit mobile version